फिलिपो पालिझी - "ल्यि स्कावी दि पॉम्पेई" (पॉम्पेईचे उत्खनन) (१८७०)
माध्यम - तैलरंग
११९.५ x ८६ सेंमी
खाजगी संग्रह, तुरिन
पॉम्पेईच्या उत्खनन जागेवरचा एक प्रसंग ह्या चित्रात फिलिपो पालिझीने रेखाटला आहे. एक मुलगी मातीच्या ढिगाऱ्यावर उभी राहून इमारतींच्या अवशेषांकडे बघत विचार करत उभी आहे. तिचे असे उभे राहणे अत्यंत सहज आहे, पण तरीही ती तिच्या कामातून बाजूला होऊन काहीतरी वेगळा विचार करते आहे, हे लक्षात येते.
ह्या पेंटिंगविषयी काहीही लिहिण्यापूर्वी पॉम्पेई आणि तेथील उत्खननाचा थोडा संदर्भ लक्षात घ्यायला हवा.
पॉम्पेई हे दक्षिण इटलीमधील भूमध्यसमुद्रकिनाऱ्याजवळ, नेपल्सपाशी असलेले, जवळ जवळ वीस हजार लोकवस्ती असलेले गांव. इसवीसन ७९ पर्यंत हे गांव अतिशय समृद्ध, व्यापारी बंदर होते. इसवीसन ७९ मध्ये जवळच असलेल्या व्हेसुव्हियस ज्वालामुखीच्या उद्रेकाने हे गांव लाव्हारसाच्या १३ ते २० फूट उंच ढिगाऱ्याखाली गाडले गेले. ह्या उद्रेकाचे संकेत आधी जवळपास १८ तास मिळत राहिल्यामुळे बरेचसे नागरिक स्वतःचा जीव वाचवण्यात यशस्वी झाले असावेत असा कयास आहे. मात्र जे स्वतः:ला वाचवू शकले नाहीत ते २५० डिग्री सेल्सियस तपमान असणाऱ्या राखेखाली गाडले गेले आणि क्षणार्धात अश्मीभूत झाले.
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात ह्या गावाच्या उत्खननाला सुरुवात झाली. पॉम्पेईमध्ये सापडलेले अवशेष आश्चर्यकारकरीत्या चांगल्या अवस्थेत आहेत, आणि ते त्या काळातील रोमन लोकांच्या राहणीमानाविषयी, विलासी जीवनशैलीविषयी खूप तपशीलवार आणि विश्वासार्ह माहिती / पुरावे उपलब्ध करून देतात.
वास्तविक ज्वालामुखीचा उद्रेक होत असतानाच्या पॉम्पेईमधील (अर्थात कल्पित) वातावरणाचे चित्रण हा अतिशय नाट्यमय विषय आहे, परंतु फिलिपो पालिझीने निवडलेला प्रसंग उत्खननाच्या काळातील आहे.
पॉम्पेईच्या उत्खननाचे हे चित्र आहे हे सांगावे लागणार नाही, इतक्या नेमकेपणाने त्या गावाची आणि इमारतींची सारी वैशिष्ट्ये ह्या पेंटिंगमध्ये दर्शवली गेली आहेत. सर्वात जास्त लक्षवेधी, उत्खननादरम्यान दृग्गोचर झालेले भिंतींवरचे रंग!
वास्तविक ज्वालामुखीचा उद्रेक होत असतानाच्या पॉम्पेईमधील (अर्थात कल्पित) वातावरणाचे चित्रण हा अतिशय नाट्यमय विषय आहे, परंतु फिलिपो पालिझीने निवडलेला प्रसंग उत्खननाच्या काळातील आहे.
पॉम्पेईच्या उत्खननाचे हे चित्र आहे हे सांगावे लागणार नाही, इतक्या नेमकेपणाने त्या गावाची आणि इमारतींची सारी वैशिष्ट्ये ह्या पेंटिंगमध्ये दर्शवली गेली आहेत. सर्वात जास्त लक्षवेधी, उत्खननादरम्यान दृग्गोचर झालेले भिंतींवरचे रंग!
एवढ्या उत्पातानंतरदेखील ते तसेच टिकून होते. आणि पेंटिंगमध्ये देखील ते तेवढ्याच प्रकर्षाने आले आहेत. अगदी त्या मातीच्या ढिगाऱ्यावर दर्शनी भागावर पडलेल्या तुकड्याचे रंग देखील सुंदर आले आहेत.
बाकीच्या सहकारी स्त्रिया कामात गुंतलेल्या असताना ह्या मुलीला एकूणच त्या भोवतालचे एक वेगळे भान आले आहे असे दिसते, आणि म्हणूनच ती ह्या पेंटिंगचा विषय झाली आहे. तिच्या समोर असलेल्या स्नानगृहाच्या भिंतीवर चितारलेल्या (बहुधा शृंगारिक) चित्राचा ती विचार करत असावी असे दिसते. तिने तिचा स्कर्ट किंचित उचलून धरल्यामुळे, एक हालचाल जाणवते आणि चित्र जिवंत वाटते.
थोडे तांत्रिक अंगाने बघायचे झाल्यास हे चित्र, चित्राचा मुख्य विषय कसा ठळकपणे मांडला जावा ह्याचे उत्कृष्ठ उदाहरण आहे. ह्या चित्रातील सर्व घटकांची मांडणी अश्या पद्धतीने केली गेली आहे, जेणेकरून चित्र पाहणाऱ्यांचे लक्ष आपोआप चित्राचा मुख्य विषय असणाऱ्या मुलीकडे जावे. चित्रात एक दोन काल्पनिक रेषा काढल्यास हा मुद्दा सहज लक्षात यावा. इमारतीच्या अवशेषांवरील सर्वात वरच्या किनारीवर जर एक रेष काढली तर ती त्या मुलीपर्यंत सहज पोहोचते, आणि तसेच मागे उभ्या असणाऱ्या स्त्रियांच्या आकृतीला जोडणारी रेषदेखील तिच्या चेहऱ्यावर येऊन थांबते. मागील आकाश निरभ्र असल्यामूळे चित्र पाहणाऱ्यांची दृष्टी विचलित होत नाही. चित्रामध्ये असणारे बाकीचे घटक म्हणजे इमारत, मातीचे ढीग, मागील डोंगर हे सारे साधारणपणे एकाच उंचीवर आहेत, परंतु ही मुलगी मात्र थोडी अधिक उंचीवर उभी आहे.
चित्रातील प्रकाश त्या मुलीवर अशा पद्धतीने आला आहे, की तिच्या कपड्यांचे काही भाग उजळून निघाले आहेत, आणि प्रामुख्याने तिचा चेहरा, पाय इत्यादी मात्र सावलीत आहेत. ह्या प्रकाशयोजनेमुळे देखील एक विलोभनीय कॉन्ट्रास्ट निर्माण झाला आहे. असा कॉन्ट्रास्टचा वापर तिच्या पृष्ठभूमीवर असणाऱ्या बाकीच्या आकृत्यांमध्ये पालिझीने टाळला आहे, आणि म्हणूनच चित्रातील मुलगी जास्त उठून दिसते.
***
______________________________________________________________________________
Filippo Palizzi - "Gli Scavi di Pompei" (The Excavations of Pompeii) (1870)
Oil on canvas
119.5 x 86 cm
Private Collection - Torino
Palizzi paints a scene of a few women carrying away rocks and debris at an excavation site in Pompeii. A lady stands on a pile of rubble looking down at the broken down buildings and contemplates. Her pose is very casual but also suggests that she is distracted in her thoughts about something.
Before writing about this painting, it would be appropriate to consider some factual reference of Pompeii and its excavation.
Pompeii is a town with a population of 20,000 in Southern Italy, near the Mediterranean coast, close to Naples. Until the year 79 A.D., it was a prosperous town of traders engaged in overseas trade. In the year 79 A.D., it was literally buried under lava and ashes from the eruption of the volcano from Mount Vesuvius which is very close. The warning signs of this disaster were being observed since about 18 hours earlier; hence it is believed that majority of the reidents were able to evacuate and rescue themselves. However, those few who could not, were buried under the volcanic ash and instantly fossilized.
The excavation of this town started towards the end of the 18th century. Many remnants discovered from the excavation were found surprisingly, to be in good condition. They give a fairly detailed and reliable information and evidence of the lavish lifestyle and the standard of living.
Actually, an imaginary depiction of the surroundings in Pompeii while the disaster happened, would have been quite dramatic, however, Filippo Palizzi chose a scene from the time the excavation took place.
It is not necessary to specify that this painting is of the excavation at Pompeii, as all the local features and peculiarities of the expanse of Pompeii are precisely captured in it. The most conspicuous are the colors on the walls exposed during the excation ! Despite such a calamitous ruin, they still survive. Even a small piece of the excavated wall lying on the heap of clay is colorful and beautiful.
While the other colleagues are absorbed in their work, this girl seems to be immensely conscious of the surroundings, and hence she has become the focus of the painting. She might be pondering about the amorous painting on the wall of the bath. Her lifting of the skirt depicts an action and makes the painting lively.
This painting is a really good example of creating a focal point. All the elements in the work are designed to frame the lady as the main subject in this scene. We can observe this by tracing the imaginary lines that exist within the painting that lead the viewer’s eye. The outline of the ruin building leads directly to her, and the line that traces the positions of the women in the background also goes up to her face. In addition to this, the background sky has no other element in it that could potentially distract the viewer from the main subject. All other elements in the painting, roughly stand within the same level of each other, but the woman stands above the rest.
Furthermore, the direction of light is hitting the figure at such an angle that we see patches of bright highlights on her clothes, but many parts of her body are in shadow. This allows for a really beautiful contrast, which also helps the figure pop against the flat background.
***


No comments:
Post a Comment